रफ वापरासाठी सॅमसंगचा गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ टॅबलेट

0

सॅमसंगने रफ वापरासाठी गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ हा टॅबलेट भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

स्मार्टफोनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे टॅबलेटच्या मागणीत घट होत असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. मात्र असे असले तरी अनेक कंपन्या याच प्रकारातील अनेक मॉडेल्स सादर करत आहेत. या अनुषंगाने सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ हा टॅबलेट लाँच केला आहे. याचे मूल्य ५०,९९० रूपये आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स असले तरी सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या टॅबलेट रफ वापरासाठी तयार करण्यात आला आहे. अर्थात हे मॉडेल वॉटरप्रूफ, शॉकप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. अर्थात, भारतातील विषम वातावरणाला लक्षात घेत हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. याला एमआयएल-एसटीडी-८१० जी या मानकानुसार तयार करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याला एस पेन या स्टायलस पेनचा सपोर्ट दिलेला असून याच्या मदतीने रेखाटन करता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ या मॉडेलमध्ये सॅमसंगचा एक्झीनॉस ७८७० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर चालणारे आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यामध्ये ४४५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती उत्तम बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here