सॅमसंगची किफायतशीर टिव्हींची मालिका

0

सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी फनबिलीव्हेबल ही नवीन मालिका सादर केली असून याच्या विविध व्हेरियंटस्चे मूल्य १२,९९० रूपयांपासून सुरू होणार आहे.

टिव्ही आणि स्मार्ट टिव्हीच्या बाजारपेठेत शाओमीने जोरदार मुसंडी मारली आहे. अत्यंत किफायतशीर मूल्यात दर्जेदार मॉडेल्स सादर केल्याने त्यांना ग्राहकांची पसंती मिळाली आहे. हाच कित्ता व्हियू कंपनीनेही गिरवला आहे. अर्थात, किफायतशीर मूल्यातील मॉडेल्सला ग्राहक प्राधान्य देत असल्याचे दिसून आले असून आता या सेक्टरमध्ये सॅमसंगनेही उडी घेतली आहे. या अनुषंगाने फनबिलीव्हेबल ही मालिका भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत ३२ आणि ४३ इंच डिस्प्ले आकारमानांचे व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. याच्या जोडीला ३२ इंच नॉन-स्मार्ट या प्रकारातील मॉडेलदेखील उपलब्ध करण्यात आले आहे.

फनबिलीव्हेबल या मालिकेतील मॉडेल्स हे स्मार्ट टिव्ही या प्रकारातील असून याला संगणक म्हणून देखील वापरण्याची सुविधा दिलेली आहे. यासाठी यात पर्सनल कंप्युटर मोड प्रदान करण्यात आला आहे. यासोबत प्रेझेंटेशन सादर करण्यासाठी देखील हे मॉडेल्स उपयुक्त आहेत. यात मिररकास्ट या फिचरच्या मदतीने स्मार्टफोन वा लॅपटॉपवरील कंटेंट टिव्हीवर पाहण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर रिमोट अ‍ॅक्सेस या फिचरचा वापर करून लॅपटॉप व स्मार्टफोनला दूरवरून नियंत्रीत करता येणार आहे. या टिव्हीमध्ये अमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, झी५, सोनी लिव्ह, वुथ, नेटफ्लिक्स आदी अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत दिलेली असून यावर कंटेंट गाईडदेखील पहायला मिळणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा स्मार्ट टिव्ही म्युझिक सिस्टीम म्हणून देखील वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here