सॅमसंगच्या क्युएलईडी टिव्हींची मालिका भारतात सादर

0

सॅमसंगने फोर-के आणि एट-के क्षमतेच्या क्युएलईडी या प्रकारातील डिस्प्लेंनी सज्ज असणार्‍या टिव्हींची मालिका भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.

या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या सीईएस-२०१९ या प्रदर्शनीमध्ये सॅमसंगने क्युएलईडी या प्रकारातील टिव्हींची मालिका प्रदर्शीत केली होती. यानंतर विविध देशांमध्ये याला लाँच करण्यात येत असून आता भारतीय ग्राहकांना हे मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत फोर-के आणि एट-के या दोन्ही क्षमतांमधील विविध मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील फोर-के टिव्हींच्या मालिकेचे मूल्य ९४,९०० तर एट-के टिव्हींचे मूल्य १०,९९,९०० रूपयांपासून सुरू होणार आहे.

यातील फोर-के मालिकेत क्यू ६०; क्यू ७०; क्यू ८० आणि क्यू ९० या नावांनी एकूण १२ मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. हे टिव्ही ४३, ५५, ६५ व ७५ इंच आकारमानांचे आहेत. यात सॅमसंगचा बिक्सबी तसेच गुगल असिस्टंट हे डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आले आहेत. यांच्या मदतीने व्हाईस कमांड वापरून कुणीही हव्या त्या फिचर्सचा वापर करू शकतो.

दरम्यान, एट-के रेझोल्युशन क्षमतेच्या टिव्हींमध्ये एआय म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सने युक्त असणारा क्वाँटम प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे. याच्या जोडीला एआय अपस्केलींग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे मूळ कंटेंट हे एट-के क्षमतेत नसले तरी त्याला त्या मानकात तातडीने सुलभ पध्दतीत परावर्तीत केले जाणार आहे. यात अँबियंट मोड दिलेला असून याच्या मदतीने भोवतालचे वातावरण आणि रंगसंगतीला अनुकुल अशी फ्रेम आपोआप तयार होते.

सॅमसंगच्या फोर-के आणि एट-के क्षमतांचे हे टिव्ही ग्राहकांना कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here