अरे व्वा…सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तब्बल ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा !

0

सॅमसंगने तब्बल ६४ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याने युक्त असणारा गॅलेक्सी ए७०एस हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

सध्या स्मार्टफोन्सच्या विविध मॉडेल्समध्ये जास्तीत जास्त मेगापिक्सल्सचे कॅमेरे देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रचलीत होत असतांना आता ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा ग्राहकांना वापरता येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शाओमीनंतर आता सॅमसंगनेही या प्रकारातील कॅमेरा ग्राहकांना सादर केला आहे. विशेष बाब म्हणजे सॅमसंगचे गॅलेक्सी ए७०एस हे मॉडेल पहिल्यांदा भारतात लाँच करण्यात आले आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप असून यातील प्रमुख कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा आहे. हा सॅमसंगनेच विकसित केलेला आयसोसेल जीडब्ल्यू१ हा सेन्सर आहे. याच्या जोडीला ५ मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर तर ८ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड कॅमेरे दिलेले आहेत. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. यासोबत यात नाईड मोड, १२३ अंशाचा वाईड व्ह्यूइंग अँगल, लाईव्ह फोकस आदी फिचर्स दिलेले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. फास्ट चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ४,५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिया या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा वन युआय हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए७०एस या मॉडेलमध्ये ६.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२४०० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. याचे ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट अनुक्रमे २८,९९९ आणि ३०,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रिझम क्रश रेड, प्रिझम क्रश ब्लॅक आणि प्रिझम क्रश व्हाईट या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here