सॅमसंगचे दोन फिटनेस ट्रॅकर बाजारपेठेत सादर

0

सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत गॅलेक्सी फिट आणि गॅलेक्सी फिट ई हे दोन नवीन फिटनेस ट्रॅकर सादर केले आहेत.

वेअरेबल्सच्या क्षेत्रातील घडामोडी आता गतीमान होतांना दिसत असून विविध कंपन्या नवनवीन मॉडेल्स सादर करत आहेत. या अनुषंगाने सॅमसंगने गॅलेक्सी फिट आणि गॅलेक्सी फिट ई हे दोन मॉडेल्स भारतीय ग्राहकांना अनुक्रमे ९,९९० आणि २,५९० रूपये आहे. हे दोन्ही मॉडेल्स फ्लिपकार्ट, मिंत्रा या पोर्टल्ससह सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरवरून उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील काही फिचर्स हे समान आहेत. यात प्रामुख्याने हे दोन्ही मॉडेल्स वॉटरप्रुफ आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी फिट या मॉडेलमध्ये ०.९५ इंच आकारमानाचा आणि फुल कलर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. या ट्रॅकरच्या माध्यमातून चालणे, पोहणे, धावणे, सायकलींग आदी व्यायामांचे अचूक मापन करणे शक्य आहे. यामध्ये हार्ट रेट मॉनीटरदेखील आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित पडल्यास याचा अलर्ट मिळण्याची सुविधा यात दिलेली आहे. यासोबत यामध्ये अ‍ॅक्सलेरोमीटर व गायरोस्कोपदेखील दिलेला आहे. यामध्ये ऑटो वर्कआऊट हे फिचर दिलेले असून याच्या मदतीने युजर विविध प्रकारचे वर्कआऊट कस्टमाईज करू शकतो. यासाठी देण्यात आलेल्या सॅमसंग हेल्थ अ‍ॅपच्या माध्यमातून युजर आपल्या प्रकृतीबाबत इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी पाहण्याची सुविधा यात दिलेली आहे. हा ट्रॅकर स्मार्टफोनला संलग्न करणे शक्य असून यावर कॉल्ससह संदेशांचे नोटिफिकेशन्सही पाहता येणार आहेत. यातील बॅटरी १२० मिलीअँपिअर क्षमतेची असून यामध्ये ब्ल्यु-टुथची कनेक्टीव्हिटी दिलेली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी फिट ई या मॉडेलमध्ये तुलनेत थोडा लहान आकारमानाचा म्हणजे ०.७४ इंच आकारमानाचा पीएमओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यातदेखील ऑटो वर्कआऊटची सुविधा दिली असली तरी यात मूळ मॉडेलपेक्षा कमी प्रमाणात कस्टमायझेशनची सुविधा दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here