अरेच्चा….आता आलाय व्हर्टीकल टिव्ही !

0

बदलत्या काळानुसार सॅमसंगने आता चक्क व्हर्टीकल म्हणजे उभ्या प्रकारातील डिस्प्लेची सुविधा असणारा टिव्ही ग्राहकांसाठी सादर केला आहे.

आजवर आपण सर्व टिव्ही हे हॉरीझाँटल या प्रकारातील पाहिले असून साधारणपणे आयताकृती आकारातील डिस्प्लेवर आपण चलचित्र पाहू शकतो. अर्थात, आजवरचे सर्व टिव्ही हे आयताकृती आहेत. मात्र सॅमसंग कंपनीने सेरो हे नवीन मॉडेल सादर केले असून ते नाविन्यपूर्ण आहे. एक तर हा टिव्हीदेखील आयताकृती असला तरी याला व्हर्टीकल म्हणजेच उभ्या प्रकारे वापरता येणार आहे. यात पारंपरीक आयताकृती डिस्प्लेसह उभ्या डिस्प्लेच्या स्वरूपात टिव्ही पाहण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. सेरो या टिव्हीच्या डिस्प्लेचा आकार ४३ इंची असून याची क्षमते फोर-के आहे. यात अनेक उत्तम फिचर्सचा समावेश आहे. यात ३० वॅट क्षमतेची अतिशय दर्जेदार अशी ध्वनी प्रणाली दिलेले आहे. तसेच हा टिव्ही उभ्या प्रकारात पाहण्यासाठी एक स्टँडदेखील यासोबत मिळणार आहे. यात सॅमसंगने विकसित केलेला बिक्सबी हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट दिलेला आहे. याच्या मदतीने कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडचा वापर करून आपल्याला हवे असणारे फंक्शन वापरू शकणार आहे.

सध्या स्मार्टफोनवरून प्रचंड प्रमाणात व्हिडीओज पाहिले जात आहेत. अनेक जण स्मार्टफोनवरील कंटेंट हे टिव्हीवर पाहण्यास प्राधान्य देत आहेत. आजवर टिव्हीवरील कंटेंट हे नियमित अर्थात लँडस्केप मोडमध्ये असले तरी इंटरनेटवरील बहुतांश व्हिडीओज हे स्मार्टफोनचा वापर करून उभे अर्थात पोर्टे्रट मोडमध्ये घेण्यात येत असल्याची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. यामुळे स्मार्टफोनच्या व्हिडीओ कंटेंटशी सुसंगत असा हा टिव्ही आहे. यावर स्मार्टफोनमधून काढलेल्या प्रतिमा व व्हिडीओ सुसंगतपणे पाहता येणार आहेत. याला पहिल्यांदा दक्षिण कोरियातील बाजारपेठेत सादर करण्यात आले असून लवकरच भारतासह अन्य देशांमध्ये हे मॉडेल मिळण्याची शक्यता आहे.

( खालील प्रतिमेत दर्शविल्यानुसार सॅमसंगचे सेरो हे मॉडेल पारंपरीक (आडवा) आणि व्हर्टीकल (उभा) या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here