सॅमसंगच्या आभासी मानवाचे अनावरण

0

सॅमसंगने निऑन या नावाने व्हर्च्युुअल ह्युमन (आभासी मानव)सादर केला असून यात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आला आहे.

सध्या आर्टीफिशीयल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर विपुल प्रमाणात होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमिवर, लास व्हेगास शहरात सुरू झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो अर्थात सीईएस-२०२० मध्ये सॅमसंग कंपनीने निऑन या नावाने व्हर्च्युअल ह्युमन म्हणजेच आभासी मानव सादर केला आहे. सॅमसंगची मालकी असणार्‍या स्टार लॅब्ज या संस्थेने याला विकसित केले असून याचे सीईओ प्रणव मिस्त्री यांनी एका ट्विटच्या माध्यमातून निऑनबाबतची माहिती जगजाहीर केली आहे. यानुसार निऑन हा एक प्रकारच्या व्हिडीओ चॅटबॉटनुसार काम करणार आहे. अर्थात, कुणीही विचारलेल्या प्रश्‍नांची तो उत्तरे देऊ शकेल. तो मशीन लर्नींगचा वापर करू शकतो. एक पर्सनल असिस्टंट म्हणून निऑन काम करू शकतो. याचा बाह्यावतार हव्या त्या पध्दतीत कस्टमाईज्ड करण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. हा असिस्टंट अगदी खर्‍याखुर्‍या मानवाप्रमाणे दिसणार असून तो भावनादेखील प्रदर्शीत करण्यास सक्षम आहे हे विशेष. निऑनला कोअर आर-३ ( रिअ‍ॅलिटी, रिअल टाईम, रिस्पॉन्सीव्ह ) या मानकानुसार विकसित करण्यात आले आहे.

दरम्यान, निऑन हा पर्सनल असिस्टंट असला तरी तो सध्या वापरता असलेला गुगल असिस्टंट, सिरी, अलेक्झा आदींप्रमाणे नाहीय. तर हा असिस्टंट प्रत्यक्षात युजरसोबत इंटरअ‍ॅक्ट करू शकणार आहे. हा हुबेहुब मानव दिसत असून मानवाप्रमाणेत संवाददेखील साधू शकणार आहे. प्रणव मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार निऑन हिंदी भाषादेखील बोलण्यास सक्षम असेल. सॅमसंगच्या स्टार लॅब्जने निऑनबाबतची फक्त प्राथमिक माहिती जगाला दिली असून प्रत्यक्षात ही सेवा काही महिन्यांमध्ये पूर्णपणे लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here