फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंगची सुविधा

0
facebook-messenger

फेसबुक मॅसेंजरच्या युजर्सला आता स्क्रीन शेअरिंगची सुविधा मिळणार असून याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे.

स्क्रीन शेअरिंग हे फिचर अलीकडच्या काळात लोकप्रिय झाले आहे. व्हिडीओ कॉलींग अथवा ग्रुप व्हिडीओ कॉल करतांना याचा विपुल प्रमाणात वापर करण्यात येतो. झूमसारख्या अ‍ॅपवर याला मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आता हीच सुविधा फेसबुक मॅसेंजरवरही वापरता येणार आहे. कंपनीने याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती जाहीर केली आहे. यानुसार व्हिडीओ कॉलींग अथवा ग्रुप कॉलींग करतांना याचा वापर करता येईल. हे फिचर वेब आवृत्तीसह अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीमसाठी प्रदान करण्यात आले आहे.

स्क्रीन शेअरिंगचा उपयोग करून कुणीही आपला स्मार्टफोन अथवा संगणकावरील डिस्प्ले हे अन्य युजर्ससोबत शेअर करू शकतात. यात स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यातील छायाचित्रे वा व्हिडीओज अन्य युजर्ससोबत शेअर करता येतील. तसेच याच्या मदतीने एकत्र वेब ब्राऊजींग, शॉपींग पोर्टल्सवरील खरेदी आदी बाबीही यामुळे शक्य होतील. हे फिचर ग्रुप कॉलींग आणि मॅसेंजर रूम्स या दोन्हींमध्ये वापरता येईल. सध्या ग्रुप कॉलींगसाठी ८ तर रूम्ससाठी १६ युजर्सची मर्यादा असल्याने हे सर्व युजर्स स्क्रीन शेअरिंगचा वापर करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here