शेमारूच्या व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेची घोषणा

0

शेमारू या मनोरंजनाच्या क्षेत्रातील ख्यातप्राप्त कंपनीने शेमारू मी या नावाने स्वतंत्र व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

भारतात ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा प्रचंड गतीने लोकप्रिय होऊ लागली आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ आदींसह अन्य सेवांना युजर्सचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. यातच या क्षेत्रात नवनवीन कंपन्या एंट्री करत आहेत. या अनुषंगाने आता शेमारू या मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने स्वत:ची व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू करण्याची घोषणा करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. साधारणपणे पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ही सेवा सुरू होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. याला शेमारू मी या नावाने सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असली तरी याचे विविध प्लॅन्स नेमके कसे असतील याबाबत माहिती दिलेली नाही.

शेमारू कंपनीकडे हिंदीसह भारतीय भाषांमधील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचा अक्षरश: खजिना आहे. या कंपनीकडे तब्बल २५०० पेक्षा जास्त चित्रपटांचे हक्क असून यात नव्या आणि जुन्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. यामुळे कंटेंटचा विचार केला असता, शेमारू मी ही सेवा इतरांपेक्षा नक्कीच उजवी ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याचा अर्थातच स्पर्धक कंपन्यांना फटका बसणार हे स्पष्ट आहे. अर्थात, या क्षेत्रातील स्पर्धा ही अधिक चुरशीची बनणार हेदेखील निश्‍चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here