सोनीचे गुगल असिस्टंटयुक्त वायरलेस हेडफोन्स

0

सोनी कंपनीने गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत असणारे वायरलेस हेडफोन्स भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट आता बहुतांश उपकरणांमध्ये इन-बिल्ट अवस्थेत दिले जात आहेत. अनेक हेडफोन्समध्येही या प्रकारातील असिस्टंट प्रदान करण्यात येत आहेत. या अनुषंगाने, सोनी कंपनीने बाजारपेठेत सादर केलेल्या डब्ल्यूएच-सीएच७००एन या वायरलेस हेडफोन्समध्येही गुगल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही युजर ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांड वापरून या मॉडेलच्या विविध फंक्शनला कार्यान्वित करू शकतो. याचा लूक हा अतिशय आकर्षक असा असून याची डिझाईन ही अतिशय सुलभ आहे. याला अगदी सरळ फोल्ड करून वापरण्याची सुुविधा देण्यात आली आहे. यात अ‍ॅडजस्ट करण्याजोगे स्लायडर दिले असून यामुळे युजर त्याला हव्या त्या पध्दतीत याचा वापर करू शकतो.

याला स्मार्टफोन कनेक्ट करता येणार असून याच्या मदतीने कॉल करणे अथवा रिसिव्ह करण्याची सुविधा युजरला मिळणार आहे. या मॉडेलसाठी कंपनीने स्वतंत्र अ‍ॅप विकसित केले असून ते अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्सला वापरता येणार आहे. यातील बॅटरी अतिशय दर्जेदार असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ३५ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे या हेडफोन्सचा वापर करतांना बाह्य ध्वनींचा त्रास होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे युजरला इमर्सीव्ह या प्रकारातील ध्वनीची अनुभूती घेता येते. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथसह एनएफसीचा पर्यायदेखील दिलेला आहे. या हेडफोन्सचे मूल्य १२,९९० रूपये असून याला सोनीच्या देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here