सोनीचा पार्टी स्पीकर बाजारपेठेत दाखल

0

सोनी कंपनीने जीटीके-पीजी १० हा पार्टी स्पीकर भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात वायरलेस कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे.

सध्या वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारे स्पीकर हे पार्टीजमध्ये वापरले जात आहेत. यामुळे बर्‍याचशा कंपन्या बाजारपेठेत पार्टी स्पीकर्स लाँच करत आहेत. या अनुषंगाने सोनी कंपनीने आपले जीटीके-पीजी १० हे मॉडेल सादर केले असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे याची डिझाईन ही अतिशय आकर्षक अशी आहे. या स्पीकरच्या वरील भागात कप होल्डर प्रदान करण्यात आलेले आहेत. यामुळे यावर कुणीही ग्लास ठेवू शकणार आहेत. ही खास ओल्या पार्टीजसाठीची सोय आहे हे सांगणे नकोच. अर्थात, यावर शीतपेयांचे ग्लासही ठेवता येतील. चॉईस युजर्सला करायचा आहे ! हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे ते पाण्यातदेखील वापरता येणार आहे. तर यात कराओकेची इनबिल्ट सुविधा असल्यामुळे युजर्स आपल्या गायनाचे कौशल्य दाखवू शकतात. यात इनबिल्ट बॅटरी दिलेली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १३ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

वायरलेस कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. यामुळे याला स्मार्टफोन कनेक्ट करून यावरील संगीताचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय, यामध्ये युएसबी कनेक्ट करूनदेखील संगीत ऐकता येणार आहे. यात अतिशय दर्जेदार असे वुफर आणि ट्युटर्स देण्यात आले असल्याने सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात देण्यात आलेली डिजीटल सिग्नल प्रोसेसर म्हणजेच डीएसपी प्रणाली ही अ‍ॅटोमॅटीक सेटींगसाठी उपयुक्त आहे. याशिवाय, यात एफएम रेडिओ ट्युनरदेखील प्रदान करण्यात आलेले आहे. या वायरलेस पार्टी स्पीकरचे मूल्य १९,९९० रूपये असून सोनी कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून याला उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here