फेसबुकवर लवकरच बातम्यांसाठी स्वतंत्र विभाग

0

फेसबुकच्या युजर्सला लवकरच बातम्यांसाठी स्वतंत्र विभाग विभाग येणार असून यात विविध मीडिया हाऊसेसच्या वृत्तांना स्थान दिले जाईल.

मार्क झुकरबर्ग यांनी या वर्षाच्या एप्रिल महिन्यात जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये युजर्सला ख्यातप्राप्त प्रकाशकांचे वृत्त एकाच ठिकाणी पाहता येतील असे फिचर सूचक पध्दतीत दर्शविले होते. आता हेच फिचर सर्व युजर्सला सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले असून याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने सविस्तर वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार फेसबुकच्या युजर्सला लवकरच बातम्यांसाठी स्वतंत्र विभाग मिळणार आहे. या विभागात विविध प्रकारांमधील हेडलाईन्स, वृत्त, लेख, मुलाखती आदी कंटेंट असेल. ही सामग्री ख्यातप्राप्त मीडिया हाऊसेसची असेल. याच्या पहिल्या टप्प्यात एबीसी न्यूज, वॉशिंग्टन पोस्ट आदींसह अन्य मोठ्या अमेरिकन प्रसारमाध्यम संस्थांशी करार करण्यात आलेला आहे. अर्थात या प्रकाशकांचे कंटेंट या विभागात एकाच ठिकाणी पाहता येईल. फेसबुकने आधीच जगभरातील पब्लीशर्सला इन्स्टंट आर्टीकल्सच्या माध्यमातून अतिरिक्त कमाईची संधी दिली आहे. यात जाहिरातींच्या शेअरिंगची प्रणाली अंमलात आणलेली आहे. तर न्यूज या विभागातील लिस्टींगसाठी प्रकाशकांना विशिष्ट रक्कमदेखील मिळणार आहे. या वृत्तानुसार पब्लीशर्सला जवळपास प्रति-वर्ष ३० लक्ष डॉलर्सपर्यंत रक्कम देण्यात येणार आहे. तर अन्य लहान प्रकाशकांना याच्या तुलनेत थोडी कमी रक्कम मिळणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे फिचर सर्व युजर्सला सादर करण्यात येणार असून याचा प्रारंभ अमेरिकेपासून होणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here