गुगल मॅप्सवर दिसणार पॉप्युलर डिशेस

0
गुगल मॅप्स, google maps

गुगल मॅप्सने आता युजर्ससाठी पॉप्युलर डिशेस हे फिचर प्रदान करण्याचे संकेत दिले असून ही प्रणाली रिव्ह्यूजवर आधारित असणार आहे.

अलीकडच्या काळात गुगल मॅप्सवर अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. यात लवकरच पॉप्युलर डिशेस या नवीन सुविधेची भर पडणार आहे. सध्या हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत असून काही युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी घेण्यात येत आहे. याबाबत ९टू५ गुगल या संकेतस्थळाने सविस्तर वृत्त दिले आहे.

सध्या गुगल मॅप्सवर विविध भौगोलिक ठिकाणांची लिस्टींग करण्यात आलेली आहे. यात हॉटेल, उपहारगृहे आदींचाही समावेश असतो. यात आता कोणत्याही हॉटेलमध्ये कोणती डिश ही लोकप्रिय आहे याची माहिती मिळणार आहे. ही यादी पब्लीक रिव्ह्यूजच्या माध्यमातून निवडण्यात येणार आहे. अर्थात, ग्राहकांनी केलेल्या रिव्ह्यूजनुसार या डिशेस निवडण्यात येणार आहे. याला कुणीही एडिट करून आपले मत प्रदर्शीत करू शकणार आहे. या प्रक्रियेत कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सचा वापर करण्यात येणार की नाही ? याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही. संगणकासह गुगल मॅप्सच्या अँड्रॉइड व आयओएस आवृत्तीसाठी हे फिचर लवकरच प्रदान करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here