लवकरच स्क्रीनशॉटवरून करता येणार गुगल सर्च !

0

स्मार्टफोनवर घेतलेल्या स्क्रीनशॉटवरून गुगल सर्च करता येणार असून लवकरच हे फिचर युजर्सला प्रदान करण्यात येणार आहे.

गुगलवर इमेज अर्थात प्रतिमेच्या मदतीने सर्च करण्याची सुविधा आधीच प्रदान करण्यात आली आहे. यासाठी रिव्हर्स इमेज सर्च हे फिचर दिले असून याच्या मदतीने त्या प्रतिमेशी संबंधीत अन्य इमेजेस शोधता येतात. हे फिचर स्मार्टफोनवरदेखील वापरता येते. तथापि, आता याला लवकरच एक नवीन आयाम जुडणार असून आता स्क्रीनशॉटवरूनही रिव्हर्स इमेज सर्चप्रमाणे सर्च करता येणार आहे. हे फिचर अजून प्रयोगात्मक अवस्थेत असून याबाबत 9to5 google या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे.
या वृत्तानुसार येत्या काही दिवसांमध्ये गुगल अ‍ॅपच्या अपडेटच्या माध्यमातून स्मार्ट स्क्रीनशॉट हे फिचर मिळणार आहे. यात कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनवरून जेव्हा स्क्रीनशॉट घेईल तेव्हा त्याला गुगल सर्च हा पर्यायदेखील दर्शविण्यात येईल. यावर क्लिक केल्यास त्या स्क्रीनशॉटशी संबंधीत प्रतिमांचा शोध घेता येईल. अद्याप या फिचरला निवडक डेव्हलपर्ससाठी सादर करण्यात आले असून लवकरच याला सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येईल असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. हे फिचर गुगल लेन्सच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीदेखील या वृत्तात देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here