भारतात लवकरच मिळणार गुगल नेस्ट हब

0

गुगल लवकरच भारतीय बाजारपेठेत नेस्ट हब हा स्मार्ट डिस्प्लेयुक्त स्पीकर सादर करणार असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटने युक्त असणारे स्मार्ट स्पीकर आणि स्मार्ट डिस्प्ले सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. यात गुगल नेस्ट हब या मॉडेलचा समावेश आहे. हा एक स्मार्ट डिस्प्ले असून याला स्मार्ट स्पीकरची जोडदेखील देण्यात आली आहे. आता हेच मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. पुढील आठवड्यात गुगल नेस्ट हब १२ देशांमध्ये लाँच करण्यात येणार असून यात भारताचा समावेश असेल असे स्पष्ट झाले आहे. यात वाय-फाय कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीने हा स्मार्ट डिस्प्ले विविध फंक्शन्स पार पाडेल. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यावरून व्हिडीओ बघता येणार आहे. याला फोटो फ्रेम म्हणूनदेखील वापरता येणार आहे. तसेच याला घरातील अन्य उपकरणांशी कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. या सर्वांचे नियंत्रण नेस्ट हबवरून करता येईल. यासाठी स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशनदेखील सादर करण्यात आलेले आहे.

नेस्ट हब या उपकरणांमध्ये गुगल असिस्टंट हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आला आहे. यामुळे युजर ओके गुगल अथवा हे गुगल म्हणून याला ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांड देऊ शकतो. यावरून वेब सर्फींग करण्यासह वाहतुकीचे अलर्ट, विविध नोटिफिकेशन्स, हवामानाची माहिती आदींची माहिती युजर मिळवू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय ग्राहकांसाठी हे प्रॉडक्ट ८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध केले जाणार आहे. गुगल नेस्ट हबला अमेझॉनच्या इको शो या उपकरणाशी तीव्र स्पर्धा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here