जिओमीट व्हिडीओ कॉन्फरन्सींग सेवा सर्वांसाठी होणार खुली

0

रिलायन्स जिओची जिओमीट या नावाचे बीटा पध्दतीत उपलब्ध असणारी व्हिडीओ कॉन्फरन्सींग सेवा आता सर्व युजर्ससाठी खुली करण्याची घोषणा केली आहे.

सध्या टेकविश्‍वात व्हिडीओ कॉन्फरन्सींगशी संबंधीत सेवांना प्रचंड प्रमाणात असलेल्या मागणीची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे बहुतांश कंपन्यांनी यावरच आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता सर्व कंपन्या ग्रुप व्हिडीओ कॉलींग सेवांकडे वळल्याचेही दिसून येत आहे. यात आता जिओची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच फेसबुकने जिओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यानंतर टेकविश्‍वात कुतुहलाचे वातावरण निर्मिती झाले. या गुंतवणुकीनंतर जिओमार्ट ही सेवा व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या पाठोपाठ आता जिओमीट ही ग्रुप कॉलींगची सेवा सर्वांना खुली करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जिओमीट बाबत आधीच घोषणा करण्यात आली असून ही सेवा अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी प्रयोगात्मक म्हणजेच बीटा अवस्थेत उपलब्ध होती. तथापि, आता जिओमीट हे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. जिओमीटमध्ये अनेक सरस फिचर्स आहेत. यात झूम अ‍ॅपप्रमाणे एकाच वेळी १०० युजर्सशी संवाद साधता येणार आहे. यात एचडी कॉलींगची व्यवस्थादेखील आहे. ही सेवा अँड्रॉइड व आयओएस सोबतच डेस्कटॉप युजर्ससाठी विंडोज आणि मॅकओएस या प्रणालींसाठी उपलब्ध राहणार आहे. गुगल क्रोम व मोझीला फायरफॉक्स या ब्राऊजर्समध्ये जिओमीट वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here