लवकरच येणार पेटीएमची व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा

0

पेटीएम लवकरच व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

भारतीय बाजारपेठेत व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. यात नेटफ्लीक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार आदींसह अनेक कंपन्या आघाडीवर आहेत. यात आता पेटीएमदेखील उडी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गत काही महिन्यांपासून पेटीएम स्वत:ची व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी पेटीएमने जय्यत तयारीदेखील केली आहे. यात अन्य कंपन्यांच्या कंटेंटसह स्वत: विविध शोज, वेब सेरीज, डॉक्युमेंटरीज आदी सादर करण्यात येणार असून पेटीएमने याबाबत प्रोफेशनल्सची भरीतीदेखील सुरू केली आहे. याबाबत पेटीएम लवकरच अधिकृत घोषणा करू शकते.

डिजीटल पेमेंट सिस्टीममधील अग्रेसर नाव असणार्‍या पेटीएमने अलीकडच्या काळात आपल्या सेवांचा जाणीवपूर्वक विस्तार केला आहे. या अनुषंगाने आपल्या वैविध्याचा पट अजून विस्तृत करत व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात ही कंपनी पदार्पण करणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या क्षेत्रातील स्पर्धा अजून तीव्र होण्याचे संकेत आहेत. फ्लिपकार्टसह अन्य कंपन्या याच क्षेत्रात एंट्री करण्याच्या तयारीत आहेत. म्युझिक स्ट्रीमिंगमध्ये अग्रेसर असणारी स्पॉटीफाय कंपनीदेखील भारतात लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या कंपनीने अलीकडेच टि-सेरीजसोबत सहकार्याचा करार केला आहे. यामुळे टि-सेरीजकडील १.६ लक्ष गाण्यांचे अधिकार स्पॉटीफायला मिळाले आहेत. यामुळे आता या क्षेत्रातील स्पर्धा ही अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here