ऐकले का…आता पबजी मोबाईल गेम खेळण्यासाठी लागणार पैसे !

0
पबजी गेम, pubg game

तुफान लोकप्रिय ठरलेल्या पबजी मोबाईल गेम खेळण्यासाठी लवकरच पैसे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले असून यासाठी दोन प्रिमीयम सबस्क्रीप्शन प्लॅन सादर करण्यात येणार आहे.

पबजी मोबाईल गेमने तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. अनेक ठिकाणी तर परिक्षेच्या कालखंडात या गेमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. आजवर हा गेम मोफत खेळता येत होता. यात इन-अ‍ॅप परचेसची सुविधा असली तरी हा गेम प्राथमिक पातळीवर अगदी चकटफू उपलब्ध असल्यामुळे याला अलोट लोकप्रियता लाभली असल्याचे मानले जात होता. आता मात्र हा गेम खेळण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण पबजी मोबाईल बनविणार्‍या कंपनीने यासाठी प्राईम आणि प्राईम प्लस या नावाने दोन सबस्क्रीप्शन प्लॅन सादर करण्याचे जाहीर केले आहे. याला पहिल्यांदा मोजक्या राष्ट्रांमध्ये लागू करण्यात आले असले तरी लवकरच भारतासह अन्य देशांमध्येही ही आकारणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यातील प्राईमच्या मेंबरशीपसाठी ०.९९ डॉलर्स म्हणजेच सुमारे ९१ रूपये तर प्राईम प्लससाठी ९.९९ म्हणजे अंदाजे ७१३ रूपये मोजावे लागणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात याला ४.९९ डॉलर्स अर्थात ३५६ रूपये प्रतिमहा इतक्या सवलतीच्या दरात सादर करण्यात आले आहे.

पबजी मोबाईलच्या प्राईम मेंबरशीप असलेल्या ग्राहकाला डेली रिवॉडर्ससह १५० युसी मिळणार आहेत. तर प्राईम प्लसच्या युजर्सला महिन्यात एकूण ९०० युसी मिळणार आहे. सध्या तरी कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थात, प्रिमीयम सेवा आल्या तरी युजर मर्यादीत प्रमाणात पबजी मोबाईल गेम खेळू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here