लवकरच स्मार्टफोनविना वापरता येणार व्हाटसअ‍ॅप !

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपची लवकरच स्वतंत्र आवृत्ती येणार असून याचा वापर करण्यासाठी स्मार्टफोनची आवश्यकता नसेल अशी माहिती आता समोर आली आहे.

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरला वापरण्यासाठी सध्या अँड्रॉइड वा आयओएस अ‍ॅपसह डेस्कटॉप आवृत्ती उपलब्ध करण्यात आलेली आहे. अर्थात, वेबवरून व्हाटसअ‍ॅप वापरतांनाही स्मार्टफोनमधून क्युआर कोड स्कॅन करावा लागतो. म्हणजेच स्मार्टफोनविना व्हाटसअ‍ॅप वापरणे अशक्य आहे. तथापि, आता समोर आलेल्या माहितीनुसार मोबाईल क्रमांक नसतांनाही व्हाटसअ‍ॅपचा वापर करता येणार आहे. याबाबत WaBetaInfo या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार व्हाटसअ‍ॅप लवकरच युडब्ल्यूपी म्हणजे युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र अ‍ॅप सादर करणार आहे. याच्या सोबतीला फोनची सुविधा नसतांनाही व्हाटसअ‍ॅप वापरण्याची प्रणाली प्रदान करण्यात येणार आहे. तसेच व्हाटअ‍ॅप लवकरच एकाच वेळेस विविध उपकरणांवर ग्रुप व वैयक्तीक चॅटींगचा वापर करण्याची सुविधा देखील देऊ शकते. या दोन्ही प्रणाली युडब्ल्यूपी सोबत काम करतील. याच्या मुळे कुणीही स्मार्टफोन नसला तरी संगणकावरून व्हाटसअ‍ॅपचा वापर करू शकतात. यात ऑफलाईन म्हणजे इंटरनेट नसतांनाही हा मॅसेंजर वापरण्याची सुविधा मिळणार आहे. WaBetaInfo ने दिलेल्या वृत्तानुसार अजून या सर्व बाबी प्रयोगात्मक अवस्थेत असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here