व्हाटसअ‍ॅपवरील स्टेटस् फेसबुक स्टोरीज म्हणून शेअर करता येणार

0

व्हाटसअ‍ॅपच्या आगामी आवृत्तीमध्ये स्टेटसला फेसबुकवर स्टोरीजच्या स्वरूपात शेअर करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी बीटा आवृत्ती वापरण्याची सुविधा दिलेली आहे. यात आगामी आवृत्त्यांमधील विविध फिचर्स हे प्रयोगात्मक अवस्थेत वापरता येतात. या अनुषंगाने अँड्रॉइड युजर्ससाठी व्हाटसअ‍ॅपने २.१९.१५१ ही बीटा आवृत्ती सादर केली आहे. यात सर्वात लक्षणीय बाब म्हणजे व्हाटसअ‍ॅपवरील स्टेटस्ला फेसबुकवर स्टोरीज या स्वरूपात शेअर करता येणार आहे. अर्थात, ही स्टोरी २४ तासांपर्यंत लाईव्ह राहून नंतर नष्ट होणार आहे. फेसबुकवर स्टोरीज मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. याची लोकप्रियता वाढीस लागली आहे. तर व्हाटसअ‍ॅपवरील स्टेटसदेखील बहुसंख्य युजर्स वापरत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, स्टेटसला फेसबुक स्टोरी म्हणून वापरण्याची सुविधा ही युजर्सच्या पसंतीत उतरू शकते. विशेष करून यामुळे युजर्सची एंगेजमेंट वाढण्याची शक्यता आहे. यासाठी स्टेटसच्या खाली अ‍ॅड टू फेसबुक स्टोरी हे बटन देण्यात येणार आहे. अर्थात, संबंधीत युजरच्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक अ‍ॅप इन्स्टॉल असेल तरच हे बटन अ‍ॅक्टीव्ह असेल.

दरम्यान, व्हाटसअ‍ॅपच्या आगामी आवृत्तीमध्ये क्युआर कोडची सुविधादेखील देण्यात येणार आहे. या माध्यमातून कुणीही क्युआर कोडच्या मदतीने आपल्या मोबाईल क्रमांकासह अन्य माहिती समोरच्या युजरला पाठविता येणार आहे. हे दोन्ही फिचर्स सध्या प्रयोगात्मक अवस्थेत असून याला लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here