लवकरच मिळणार शाओमी रेडमी गो स्मार्टफोन

0

शाओमी कंपनी भारतीय ग्राहकांसाठी लवकरच शाओमी रेडमी गो हा अत्यंत किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत मिळाले आहेत.

गत महिन्यातच शाओमी कंपनी अँड्रॉइड गो या प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती समोर आली होती. आता हे मॉडेल लवकरच भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. शाओमी कंपनीने सातत्याने किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स असणारे मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत. यामुळे या कंपनीला भारतात अतिशय उत्तम यश लाभले आहे. यातच आता लवकरच ही कंपनी शाओमी गो हे मॉडेल सादर करणार असून हा कंपनीचा आजवरचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा अँड्रॉइड गो या प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन असणार आहे. अँड्रॉइड गो या प्रणालीच्या अंतर्गत ५१२ एमबी अथवा १ जीबी रॅम असणार्‍या स्मार्टफोन युजर्सला अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीमधील सर्व फिचर्स वापरण्याची सुविधा देण्यात येते. यासाठी युट्युब गो, गुगल गो आदींसह अन्य स्वतंत्र अ‍ॅपदेखील इनबिल्ट अवस्थेत देण्यात येतात. शाओमी रेडमी गो हे मॉडेल लवकरच विविध देशांमध्ये सादर करण्यात येणार आहे.

शाओमीचा रेडमी गो हा स्मार्टफोन पहिल्यांदा फिलीपाईन्समध्ये आणि लवकरच भारतात सादर करण्यात येणार असून याच्या काही फिचर्सचे लीकदेखील समोर आले आहेत. यानुसार अँड्रॉइड पाय (गो एडिशन) या प्रणालीवर चालणारा असून याची रॅम १ जीबी असणार आहे. यामध्ये १८:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला असेल. यातील मुख्य व फ्रंट कॅमेरे अनुक्रमे ८ व ५ मेगापिक्सल्सचे असतील. यातील अन्य फिचर्सची माहिती देण्यात आलेली नाही. भारतात हे मॉडेल पाच हजारांच्या आत सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here