सिस्का बीट प्रो इयरफोन्स सादर

    0

    सिस्का कंपनीने बीट प्रो हे इयरफोन्स भारतीय ग्राहकांना सादर केले असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारात खरेदी करता येणार आहे.

    अलीकडच्या काळात वायरलेस इयरफोन्स जास्त प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. यामुळे बहुतांश कंपन्या याच प्रकारातील मॉडेल्स सादर करत आहेत. अर्थात, असे असले तरी वायर्ड इयरफोन्सची बाजारपेठदेखील मोठी आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन सिस्का कंपनीने बीट प्रो हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. याचे मूल्य ८९९ रूपये आहे. तथापि, अमेझॉन इंडियावर हे मॉडेल ४९९ रूपये मुल्यात प्रारंभी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या जोडीला सर्व ऑनलाईन शॉपींग पोर्टल्स आणि ऑफलाईन स्टोअर्समधूनदेखील याला खरेदी करता येणार आहे.

    सिस्का बीट प्रो या मॉडेलमध्ये ३.५ मीमी ऑडिओ जॅक प्रदान करण्यात आलेला आहे. यात इन-एयर या प्रकारातील डिझाईन दिलेले आहे. तर यावर प्ले-पॉजसह विविध फंक्शन्ससाठी स्वतंत्र बटन देण्यात आलेले आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात नॉईस कॅन्सलेशन प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे युजरला अतिशय उच्च दर्जाच्या संगीताची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातून हाय-फाय इमर्सीव्ह साऊंडचा आनंद मिळणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. यामध्ये इनबिल्ट मायक्रोफोन देण्यात आला असून याच्या मदतीने या इयरफोन्सशी संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करता येणार असून आलेले कॉल्स रिसिव्हदेखील करता येतील.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here