सिस्काचा साऊंडप्रो वायरलेस हेडसेट

0

सिस्काने भारतीय बाजारपेठेत एचएसबी ३००० साऊंडप्रो हा नवीन वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा हेडसेट लाँच केला आहे.

सिस्का अ‍ॅसेसरीज या कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक उपकरणे सादर केली असून यात आता एचएसबी ३००० साऊंडप्रो या नवीन हेडसेटची भर पडली आहे. हे हेडफोन काळा आणि राखाडी या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ३,४९० रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. शीर्षकात नमूद केल्यानुसार हा वायरलेस हेडसेट आहे. ब्ल्यु-टुथच्या मदतीने हा हेडसेट स्मार्टफोन, टॅबलेटसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. यात ४० एमएम बास ड्रायव्हर दिलेला असून याच्या जोडीला नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. याच्या मदतीने युजर्सला अतिशय उच्च दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याचे इयरकप्स हे फोल्ड करता येणारे असून ते युजर्सच्या कानावर कोणताही अतिरिक्त दबाव न टाकता फिट बसणारे आहेत. यातील एका इयरकपवर युजर्सला कंट्रोल पॅनल दिलेले आहे. यावरून कुणीही संगीत चालू/बंद करण्यासाठी पॉज/बॅकवर्ड/फॉरवर्ड करू शकतो. याशिवाय, याच्यावरूनच आलेला कॉल रिसिव्ह करता येणार आहे. यातील बॅटरी ही दर्जेदार असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे आठ तासांचा बॅकअप देते. तर ही बॅटरी अवघ्या दोन तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

सिस्काचा हा हेडसेट अतिशय आकर्षक लूक असणारा असून याचे डिझाईन हे युजसाठी अतिशय सुविधाजनक असेच आहे. वजनाने हलका आणि घडी करण्याची सुविधा असल्याने युजर याला अगदी सहजपणे कुठेही नेऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here