टाटा स्काय बिंज प्लस सेटटॉप बॉक्स सादर

0

टाटा स्कायने आपल्या बहुप्रतिक्षीत बिंज प्लस या सेट टॉप बॉक्सला ग्राहकांसाठी सादर केले असून यात अनेक सरस फिचर्स आहेत.

टाटा स्काय बिंज प्लस या नावाने सेटटॉप बॉक्स लाँच करणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती. याचे अनेक लीक्सदेखील आले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज या मॉडेलला अधिकृतपणे बाजारपेठेत सादर करण्यात आले. हा अँड्रॉइड टिव्ही सेट टॉप बॉक्स आहे. अर्थात, याच्या मदतीने युजर इंटरनेटवरील कंटेंटला पाहू शकणार आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे यासोबत देण्यात आलेल्या रिमोट कंट्रोलमध्ये व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे कुणीही आपल्याला हवे असणारे अ‍ॅप हे व्हाईस कमांड देऊन पाहू शकतो. याचा वापर करून गुगल प्ले स्टोअरवरील हवे ते अ‍ॅप वापरता येणार आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरवरील पाच हजार अ‍ॅप्स आणि गेम्सला इन्स्टॉल करून वापरता येणार आहे. यात कॅचअप हे फिचर दिले असून याच्या मदतीने टिव्हीवरील गत आठ दिवसांमधील कार्यक्रम पहाता येणार आहेत. सॅटेलाईटच्या माध्यमातून येणारे लाईव्ह फिड आणि इंटरनेटच्या माध्यमातून येणार्‍या ओटीटी सेवा यांच्यात सुलभपणे शिफ्ट करण्याची सुविधा यात दिलेली आहे. याची रॅम दोन जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी इतके देण्यात आलेले आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइड ९ या आवृत्तीवर चालणारे आहे.

बिंज प्लस सेट टॉप बॉक्सचे मूल्य ५,९९९ रूपये असून ग्राहकाला पहिल्या महिन्यासाठी याची सेवा मोफत देण्यात येणार आहे. यानंतर मात्र ग्राहकाला २४९ रूपये प्रति-महिना इतकी आकारणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here