टाटा टिगॉरची नवीन एएमटी आवृत्ती

0

टाटा मोटर्सने आपल्या टिगॉर या मॉडेलला एएमटी ट्रान्समीशन या प्रकारात सादर केले असून याचे दोन व्हेरियंट उपलब्ध करण्यात आले आहेत.

टिगॉर हे मॉडेल आधीदेखील एएमटी या पर्यायात उपलब्ध होते. तथापि, हा पर्याय फक्त वायझेड या व्हेरियंटसाठी उपलब्ध होता. मात्र यानंतर हे व्हेरियंट डिसकंटीन्यू करण्यात आले असून आता एक्सएमए आणि एक्सझेडए प्लस या दोन व्हेरियंटसाठी एएमटीचा पर्याय प्रदान करण्यात आलेला आहे. यांचे दिल्लीतील एक्स-शोरूम मुल्य अनुक्रमे ६.३९ आणि ७.२४ लाख रूपये आहे. यात १.२ लीटर क्षमतेचे रेव्होट्रॉन या प्रकारातील पेट्रोल इंजिन देण्यात आले असून याला एएमटी ट्रान्समीशन संलग्न करण्यात आले आहे. यातील एक्सझेडए प्लस या व्हेरियंटमध्ये तुलनेत उच्च दर्जाचे फिचर्स आहेत. यात ७ इंची डिस्प्लेयुक्त इन्फोटेनमेंट सिस्टीम प्रदान करण्यात आली असून यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले यांचा सपोर्ट प्रदान करण्यात आलेला आहे. तर यात हर्मन या कंपनीची आठ स्पीकर्सने युक्त असणारी दर्जेदार ध्वनी प्रणालीदेखील दिलेली आहे.

सुरक्षेसाठी या मॉडेलमध्ये यात इबीडीयुक्त एबीएस प्रणाली, ड्युअल फ्रंट एयरबॅग्ज आदी सुविधा दिलेल्या आहेत. याच्या जोडीला रिव्हर्स पार्कींग सेन्सर, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, इंजिन मोबिलायझर, रिअर आर्मरेस्ट आदी फिचर्स यात देण्यात आलेले आहेत. बाह्यांगाचा विचार केला असता, या मॉडेलचा लूक अतिशय आकर्षक असा आहे. यामध्ये नवीन प्रोजेक्टल हेडलँप्स, डायमंड कट अलॉय व्हिल्स, ऑटो-फोल्ड या प्रकारातील ओआरव्हीएम आदींचा यात समावेश करण्यात आलेला आहे. टाटा टिगॉरचे हे नवीन मॉडेल्स कंपनीच्या देशभरातील शो-रूम्समधून उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here