व्हाटसअ‍ॅपप्रमाणे टेलीग्राम व सिग्नलही वापरण्यासाठी असुरक्षित !

0

व्हाटसअ‍ॅपला पर्याय म्हणून उपलब्ध असणारे टेलीग्राम व सिग्नल हे अ‍ॅप्सदेखील वापरण्यासाठी सुरक्षित नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

अलीकडच्या काळात पेगासेस मालवेअरच्या मदतीने व्हाटसअ‍ॅपवर करण्यात आलेली हेरगिरी उघडकीस आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे व्हाटसअ‍ॅपच्या युजर्समध्ये अस्वस्थता पसरली असून अनेकांनी या मॅसेंजरला पर्याय शोधण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने बरेच युजर्स आता टेलीग्राम आणि सिग्नल या अ‍ॅप्सकडे वळल्याचे ताज्या डाऊनलोड करण्यात आलेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे. तथापि, व्हाटसअ‍ॅपप्रमाणेच टेलीग्राम आणि सिग्नल हे अ‍ॅपसुध्दा वापरण्यासाठी असुरक्षित असून यातील माहिती चोरली जाण्याचा धोका असल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात एमआयटी या ख्यातप्राप्त संस्थेच्या संशोधकांनी केलेले संशोधन प्रकाशित केल्याने टेकविश्‍वाचे याकडे लक्ष वेधले गेले आहे.

या संशोधनानुसार टेलीग्राम आणि सिग्नल या अ‍ॅपमधील माहितीदेखील चोरणे शक्य आहे. व्हाटसअ‍ॅपप्रमाणे टेलीग्राममधील प्रत्येक चॅटींगला एंड-टू-एंड एनक्रिप्शनचे सुरक्षा कवच देण्यात आलेले नाही. तर यामध्ये सिक्रेट चॅट हे एक फिचर असून ते अ‍ॅक्टीव्हेट केल्यानंतर या प्रकारची सुरक्षा मिळते. तथापि, या कवचाला देखील भेदता येणार असल्याचा दावा एमआयटीच्या या संशोधकांनी केला आहे.

व्हाटसअ‍ॅपचे जगभरात सुमारे दीडशे कोटींपेक्षा जास्त युजर्स असून भारतातील वापरकर्ते हे सुमारे ४० कोटींच्या आसपास आहेत. टेलीग्राम हे अ‍ॅप सुमारे २० तर सिग्नल अ‍ॅप अंदाजे १० कोटी युजर्स वापरत असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here