अरेच्चा….या स्मार्टफोनच्या मागील बाजूस असतील पाच कॅमेरे !

0

हुआवे कंपनीने आता पाच कॅमेरे असणारे स्मार्टफोन बाजारपेठेत सादर करण्याची तयारी केली असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

हुआवे कंपनीने अलीकडेच पी२० प्रो हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन लाँच केला आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. अर्थात याच्या मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. या प्रकारातील हा जगातील पहिला स्मार्टफोन बनला आहे. आता हुआवेने याच्या पुढील टप्पा गाठण्याची तयारी पूर्ण केल्याचे संकेत मिळाले आहेत. ही कंपनी आता हुआवे मेट ३० प्रो हे मॉडेल लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील स्मार्टफोन असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असणार आहे. तथापि, यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यातील पाच कॅमेर्‍यांचा सेटअप असेल. हे पाचही कॅमेरे मागील बाजूस चौरसाकृती आकारात देण्यात येणार असून यामध्ये एलईडी फ्लॅशचाही अंतर्भाव करण्यात आलेला असेल. या सर्व कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय सजीव अशा प्रतिमा घेता येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत हुआवे कंपनी लवकरच अधिकृत घोषणा करू शकते.

हुआवेने अलीकडच्या कालखंडात अतिशय प्रचंड गतीने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. या कंपनीने जागतिक बाजारपेठेत अ‍ॅपलला मागे टाकून दुसर्‍या क्रमांकाच्या स्मार्टफोन उत्पादक कंपनीचा बहुमान मिळवला आहे. या पार्श्‍वभूमिवर, पाच कॅमेर्‍यांचा स्मार्टफोन लाँच करून ही कंपनी या स्पर्धेत अजून आघाडी घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here