टायमेक्स हेलीक्सचे दोन फिटनेस ट्रॅकर्स

0

टायमेक्स हेलीक्सने गुस्तो आणि गुस्तो एचआरएम हे दोन फिटनेस ट्रॅकर्स भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहेत.

टायमेक्सची मालकी असणार्‍या हेलीक्सने आता फिटनेस ट्रॅकर्सच्या उत्पादनात पदार्पण करत गुस्तो आणि गुस्तो एचआरएम हे दोन प्रॉडक्ट अनुक्रमे १,४९५ आणि २,२९५ रूपये मूल्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध केले आहेत. या दोन्हींमधील बहुतांश फिचर्स समान आहेत. फरक हा डिस्प्लेचे आकारमान आणि बॅटरीमध्ये आहे. यातील डिस्प्लेंचे आकार हे अनुक्रमे ०.४२ आणि ०.९६ इंच इतके आहे. अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅपच्या मदतीने हे ट्रॅकर्स स्मार्टफोनशी कनेक्ट करता येणार आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनवरील नोटिफिकेशन्सला या मॉडेल्सच्या डिस्प्लेवर पाहता येणार आहे.

या दोन्ही फिटनेस ट्रॅकर्समध्ये अनेक फिचर्स दिलेले आहेत. यात चाललेल्या अंतराचे मापन, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज, सायकलींग, रनींग आदींसह व्यायामशाळेतील विविध वर्कआऊटचे मापन यातून करता येईल. तर गुस्तो एचआरएम या मॉडेलमध्ये हार्ट रेट मॉनिटर, कॅमेरा कंट्रोल, फोन फाइंडर आदी अतिरिक्त फिचर्स दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here