टोयोटा कंपनीने आपले ग्लांझा हे हॅचबॅक या प्रकारातील मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून याला मारूती सुझुकीच्या सहाकार्याने तयार करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वीच टोयोटा मोटर्स आणि मारूती सुझुकीने सहकार्याचा करार केल्याची घोषणा केली होती. यानुसार या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तरित्या काही मॉडेल्स तयार करण्यात येतील असे सांगितले होते. यानुसार या कराराद्वारे ग्लांझा हे मॉडेल निर्मित करण्यात आले आहे. मारूती सुझुकीच्या बलेनो हे लोकप्रिय मॉडेलनुसार याचे डिझाईन करण्यात आली आहे. अर्थात, यातील बहुतांश फिचर्स हे बलेनोसारखेच असल्याची बाब उघड आहे. तथापि, याच्या बाह्यांगात काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. तर अन्य फिचर्सचा अंतर्भावदेखील करण्यात आलेला आहे.
टोयोटा ग्लांझा हे मॉडेल जी आणि व्ही या दोन मालिकांमध्ये सादर करण्यात आले आहे. यातील व्ही ही मालिका प्रिमीयम अर्थात उच्च दर्जाची आहे. या मालिकेतील हायर व्हेरियंटमध्ये डे-टाईम रनींग लँप्स, क्लायमेट कंट्रोल, इन्फोटेनमेंट सिस्टीम्स, रिव्हर्स पार्कींग सेन्सर आदी फिचर्सचा समावेश असेल. उर्वरित फिचर्समध्ये यात अद्ययावत ग्रील दिलेले आहे. याशिवाय, यात अलॉय व्हील्स, एलईडी हेड आणि टेल लँप्स, इबीडीयुक्त एबीएस प्रणाली, ड्युअल फ्रंट एयरबॅग्ज आदी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
टोयोटा ग्लांझा मॉडेलमध्ये के१२बी हे १.२ लीटर क्षमतेचे आणि के१२ड्युअल जेट अशा दोन पेट्रोल इंजिनांचे पर्याय असून हे दोन्ही इंजिन्स बीएस६ या मानकानुसार तयार करण्यात आलेले आहेत. याला ५ स्पीड मॅन्युअल तसेच सीव्हीटी ट्रान्समिशनचे पर्यायदेखील प्रदान करण्यात आले आहेत. याचे विविध व्हेरियंट हे पुढीलप्रमाणे आहेत. जी एमटी स्मार्ट हायब्रीड (७.२२ लाख); जी सीव्हीटी (८.३० लाख); व्ही एमटी (७.५८ लाख) आणि व्ही सिव्हीटी (८.९० लाख). यातील सर्व किमती या एक्स-शोरूम आहेत. टोयोटा कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून हे सर्व व्हेरियंटस् उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.