ट्रुव्हीजनची होम थिएटर सिस्टीम दाखल

0

ट्रुव्हीजन कंपनीने ४.१ चॅनल होम थिएटर सिस्टीम भारतीय ग्राहकांसाठी सादर केली असून याला देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे.

ट्रुव्हीजन कंपनीने टिव्ही४०२५बीटी हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. वर नमूद केल्यानुसार यात ४.१ चॅनल देण्यात आलेले आहेत. अर्थात, यातील एक ड्रायव्हर तर चार सॅटेलाईट स्पीकर्स असणार आहेत. यातील एकूण आऊटपुट हे ७० वॅट इतके असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात डीप बास साऊंडयुक्त संगीताचा आनंद घेता येणार आहे. यासाठी याच्या वुफरवर स्वतंत्र बटनदेखील प्रदान करण्यात आले आहे. तर याच्या ड्रायव्हरवर एलईडी डिस्प्ले आणि अन्य बटन्स दिलेले असून याच्या मदतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे.

ट्रुव्हीजनच्या या होम थिएटर सिस्टीममध्ये ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी दिलेली आहे. यामुळे यात स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांमधील संगीताचा आनंद घेता येणार आहे. तर यात ऑक्झ-इन हा पर्यायदेखील उपलब्ध असल्यामुळे याचा वायरलेससह वायर्ड या प्रकारातही उपयोग करता येणार आहे. तसेच यात युएसबी पोर्टदेखील दिलेले आहे. यात एफएम रेडिओदेखील इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here