ट्विटवरील रिप्लाय लपविण्याची सुविधा

0
twitter app, ट्विटर

ट्विटरने आपल्या युजर्ससाठी कोणत्याही ट्विटवरील रिप्लाय हाईड करण्याची सुविधा आता सर्वांसाठी खुली करण्याची घोषणा केली आहे.

ट्विटरने गेल्या काही महिन्यांपासून रिप्लाय हाईड करण्याच्या फिचरची चाचणी घेतली होती. यानंतर आता हे फिचर सर्व युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. ट्विटरच्या अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसह वेब आवृत्तीसाठीही ही सुविधा आता प्रदान करण्यात आलेली आहे. याच्या माध्यमातून युजर त्याच्या कोणत्याही ट्विटवरील रिप्लाय हे अन्य युजर्सला पाहण्यापासून लपवू शकतो. याचा सर्वात मोठा लाभ असा की, एखाद्या ट्विटवर जर कुणी आक्षेपार्ह वा असभ्य प्रकारात टिपण्णी केल्यास याची माहिती सर्व युजर्सला होत असे. यामुळे संबंधीत ट्विट डिलीट केल्याशिवाय त्याला कोणताही अन्य पर्याय नसे. आता मात्र हाईड रिप्लाय या फिचरच्या मदतीने या सगळ्या प्रकारावर मात करता येणार आहे. याच्या जोडीला कुणा युजरला एखाद्या ट्विटवर सुरू असणारे संभाषण पहायचे असेल तर त्याला बाजूला असणार्‍या आयकॉनवर क्लिक करावे लागणार आहे.

दरम्यान, ट्विटरने आता ट्विट शेड्यूल करण्याची सुविधा प्रदान करण्याच्या दिशेने पाऊल टाकत याची चाचणी सुरू केली आहे. या फिचरच्या मदतीने आता कुणीही आपले ट्विट हे अमुक-तमुक वेळेस प्रसिध्द व्हावे असे शेड्युल लाऊ शकतो. या प्रकारची सुविधा फेसबुकवर आधीच प्रदान करण्यात आली असून ती युजर्सच्या पसंतीस उतरली आहे. ट्विटरच्या युजर्सलाही आता ही सुविधा मिळणार आहे. हे फिचर सध्या प्रयोगात्मक अवस्थेत असून याला लवकरच सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यासोबत ट्विटरने आपल्या युजर्सला टु-फॅक्टर ऑथेंटीकेशन या प्रक्रियेसाठी स्मार्टफोन संलग्न करण्याची अटदेखील शिथील केली आहे. अनेक युजर्सचे एकएमएस हॅक होऊन पर्यायाने ट्विटर अकाऊंटही हॅक होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here