ट्विटरवर एकत्रीत लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा

0

ट्विटरने एकाच वेळी तीन युजर्सला एकत्रीत लाईव्ह स्ट्रीमिंग करता येण्याची सुविधा प्रदान करणारे फिचर सादर केले आहे.

बहुतांश सोशल साईट प्रमाणे युजर ट्विटरवरूनही लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतो. यात आता थोडी अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. आता कोणताही युजर हा दुसर्‍या युजरला आपल्यासोबत लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी आमंत्रीत करू शकतो. सध्या कोणताही युजर हा अन्य दोन युजर्सला (एकत्रीतपणे तीन युजर्स) आमंत्रीत करून त्याला आपल्या लाईव्ह प्रक्षेपणात सहभागी करून घेऊ शकतो. एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. तर एका ब्लॉग पोस्टद्वारे याचे विवरण देण्यात आलेले आहे. याच्या अंतर्गत लाईव्ह स्ट्रीमिंग करणारा युजर हा अन्य दोन जणांना कॉलींगच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. हा संवाद एकत्रीतपणे अन्य युजर्सला दिसेल. या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. ट्विटरने या वर्षाच्या प्रारंभी आपल्या मालकीच्या पेरीस्कोप या अ‍ॅपमध्ये या प्रकारचे फिचर दिले असून ते युजर्सच्या पसंतीस उतरले आहे. यानंतर आता ट्विटरच्या अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपमध्ये हे फिचर देण्यात आलेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्वांना ते क्रमाक्रमाने प्रदान करण्यात येणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग हे फिचर अतिशय लोकप्रिय असून याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. मात्र गैरप्रकारांसाठी याचा करण्यात येणारा वापर हा चिंतेचा विषयदेखील बनलेला आहे. अलीकडेच न्यूझिलंडमध्ये झालेल्या विकृत हल्ल्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला असून याला अटकाव करण्याचे आव्हान सोशल मीडिया साईटसमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here