आता रिट्विट करतांना मिळणार प्रतिमा, अ‍ॅनिमेशन अथवा व्हिडीओ टाकण्याची सुविधा !

0

ट्विटरने आपल्या युजर्ससाठी रिट्विट करतांना यात प्रतिमा, अ‍ॅनिमेशन अथवा व्हिडीओ टाकण्याची सुविधा देण्याचे जाहीर केले आहे.

ट्विटरच्या युजर्ससाठी रिट्विट हा अविभाज्य घटक आहे. अन्य ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेले ट्विट हे कुणीही आपल्या न्यूजफिडमध्ये रिट्विट करू शकतो. आजवर यासाठी अतिरिक्त शब्द टाकण्याची सुविधा होती. अर्थात कुणीही युजर इतरांचे ट्विट हे शेअर करतांना यावर आपले भाष्य टाकू शकत होता. आता याच प्रक्रियेमध्ये प्रतिमा, जीआयएफ अ‍ॅनिमेशन आणि व्हिडीओ आदींचाही समावेश करता येणार आहे. ट्विटरने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या माध्यमातून रिट्विट करण्याची प्रक्रिया ही अधिक रंगतदार होणार असल्याचा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच ट्विटरने रिट्विटच्या प्रक्रियेत बदल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. यावर आता या नवीन सुविधेच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here