युबॉनचा एसपी-५० हल्क वायरलेस स्पीकर

0

युबॉन इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने एसपी-५० हल्क हा वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा स्पीकर भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.

युबॉन इलेक्ट्रॉनिक्स ही विविध उपकरणांच्या उत्पादनासाठी ख्यात असणारी कंपनी असून आता त्यांनी हल्क एसपी-५० हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. वर नमूद केल्यानुसार हा वायरलेस स्पीकर आहे. अर्थात, ब्ल्यु-टुथच्या मदतीने यात संगीताचा आनंद घेता येणार आहे. युजर आपला स्मार्टफोन तसेच अन्य स्मार्ट उपकरणे याला संलग्न करू शकतो. याशिवाय, यामध्ये युएसबी, एसडी कार्ड आदींची सुविधादेखील दिलेली आहे. तसेच यात एफएम रेडिओदेखील इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेला आहे. ऑक्झ-इन पोर्टची सुविधा असल्याने हा वायर्ड स्पीकर म्हणूनदेखील उपयोगात येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात १,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून ती एकदा चार्ज झाल्यानंतर सुमारे चार तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा दावादेखील कंपनीने केला आहे.

एसपी-५० हल्क या मॉडेलचा लूक हा अतिशय आकर्षक असा असून याच्या वरील बाजूस हँडल देण्यात आले आहे. यामुळे याला वापरणे कुठेही नेण्यासाठी अडचण येणार नाही. यावर प्ले-पॉजसह अन्य फंक्शन्सचे बटन्स दिलेले आहेत. या स्पीकरचे मूल्य ३,९९९ रूपये असून देशभरातील शॉपीजसह विविध ऑनलाईन शॉपींग पोर्टलवरून याला उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here