विवोचा ट्रिपल कॅमेरा व जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन

0

विवो कंपनीने मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप व जंबो बॅटरीने सज्ज असणारा वाय १२ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

मध्यंतरी ड्युअल कॅमेरा सेटअप लोकप्रिय झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. आता याच्या पुढे जात बर्‍याच स्मार्टफोनच्या मागील बाजूस तीन अथवा चार कॅमेरे देण्यात येत आहेत. या अनुषंगाने विवो वाय १२ या मॉडेलच्या मागील बाजूसही तीन कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. हे कॅमेरे अनुक्रमे १३, ८ आणि २ मेगापिक्सल्सचे आहेत. यातील पहिला मुख्य कॅमेरा असून दुसरा वाईड अँगलने युक्त तर तिसरा डेप्थ सेन्सर या प्रकारातील आहे. यामध्ये पीपीटी, प्रोफेशनल, पीडीएएफ, पाम कॅप्चर, व्हॉइस कंट्रोल, टाईम लॅप्स, स्लो, लाईव्ह फोटोज, एचडीआर पोर्ट्रेट मोड, पॅनोरामा, बोके, वॉटरमार्क, एआय फेस ब्युटी, कॅमेरा फिल्टर आदी फिचर्स दिलेले असून यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा व व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यात एआय ब्युटी हे विशेष फिचर आहे. विवो वाय १२ या स्मार्टफोनमध्ये तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर उत्तम बॅकअप देण्यास सक्षम आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार करता, विवो वाय १२ या मॉडेलमध्ये ६.३५ इंच आकारमानाचा व एचडी प्लस (१५४४ बाय ७२० पिक्सल्स ) क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यात मीडियाटेकचा पी २२ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ९.० पाय या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा फनटच ९.० हा युजर इंटरफेस दिलेला आहे. हा स्मार्टफोन १२४९० रूपये मूल्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here