दोन व्हेरियंटमध्ये मिळणार विवो यू २० स्मार्टफोन

0

विवोने यू २० हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला असून याला दोन व्हेरियंटच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे.

विवो यू २० हे मॉडेल ४ जीबी रॅम+५४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १०,९९० आणि ११,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. याला अमेझॉन इंडियासह कंपनीच्या देशभरातील शो-रूम्समधून उपलब्ध करण्यात आले आहे. विवोने आधी लाँच केलेल्या यू १० या स्मार्टफोनची ही नवीन आवृत्ती आहे. आधीप्रमाणेच यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. यात ६.५३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६७५ हा प्रोसेसर दिलेला असून वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट असणार आहेत.

विवो यू २० या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यात पीडीएएफ सेन्सर आणि नाईट मोडची सुविधा दिलेली आहे. याला वाईड अँगलने युक्त ८ मेगापिक्सल्स तर २ मेगापिक्सल्सचा सुपर मायक्रो शॉट कॅमेर्‍यांची जोड प्रदान करण्यात आली आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यातील बॅटरी ५००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ९ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here