पॉप-अप ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी युक्त विवो व्ही १७ प्रो दाखल

0

विवो कंपनीने पॉप-अप या प्रकारातील ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी युक्त असणारा व्ही १७ प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

सध्या पॉप-अप प्रकारातील फ्रंट कॅमेर्‍यांनी युक्त असणारे अनेक मॉडेल्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. तथापि, विवो कंपनीने याच प्रकारात ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. अर्थात, अशा स्वरूपाचे हे जगातील पहिलेच मॉडेल ठरले असून ही या मॉडेलची खासियतदेखील आहे. या सेटअपमध्ये ३२ आणि ८ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यामध्ये सुपर नाईट सेल्फी, सुपर वाईड अँगल फोटो, एआय मेकअप, पोझ मास्टर फिल्टर आदी फिचर्स दिलेले आहेत. तर याच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप प्रदान करण्यात आलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला सुपर वाईड अँगलयुक्त ८ मेगापिक्सल्स; डेप्थ सेन्सरयुक्त २ मेगापिक्सल्स तर टेलीफोटो लेन्सयुक्त २ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍यांची जोड प्रदान करण्यात आली आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, विवो व्ही १७ प्रो या मॉडेलमध्ये ६.४४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२४०० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ६ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६७५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी आहे. फास्ट चार्जींगच्या सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ४,१०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. या मॉडेलचे मूल्य २९,९९० रूपये असून याला ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या याची विक्रीपूर्व नोंदणी सुरू असून २७ सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन प्रत्यक्षात उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here