किफायतशीर मूल्याचा विवो वाय ९० स्मार्टफोन

0

विवोने भारतीय बाजारपेठेत विवो वाय ९० हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन सादर केला असून यात दर्जेदार बॅटरीसह अनेक सरस फिचर्स आहेत.

विवो वाय ९० या स्मार्टफोनचे मूल्य ६,९९० रूपये असून याला ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांसाठी देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन मेक इन इंडियाच्या अंतर्गत कंपनीच्या ग्रेटर नोयडा येथील युनिटमधून उत्पादीत करण्यात आलेला आहे. वर नमूद केल्यानुसार हा एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन आहे. यातील लक्षणीय फिचर म्हणजे यात दर्जेदार बॅटरी दिलेली आहे. यात ४,३२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली असून ती उत्तम बॅकअप देण्यास सक्षम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात ६.२२ इंच आकारमानाचा व एचडी प्लस (१५२० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. या मॉडेलमध्ये मीडियाटेकचा ए २२ हा प्रोसेसर आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते वाढविता येणार आहे.

विवो वाय ९० या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉइड ओरियो ८.१ या आवृत्तीवर आधारित फनटच ओएस ४.५ या प्रणालीवर चालणारे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here