ट्विटरवर व्हाईस ट्विटस करण्याची सुविधा

0
twitter app, ट्विटर

ट्विटरने आपल्या युजर्ससाठी व्हाईस ट्विटस करण्याची सुविधा दिली असून लवकरच हे फिचर सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

ट्विटरने अलीकडच्या कालखंडात आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्‍वभूमिवर आता व्हाईस ट्विटस हे नवीन फिचर प्रदान करण्यात आले आहे. नावातच नमूद केल्यानुसार याच्या माध्यमातून युजर ध्वनीफित ही ट्विटच्या स्वरूपात अपलोड करू शकतो. आजवर टेक्स्ट, इमेज, अ‍ॅनिमेशन आदींचा समावेश असणारे ट्विट करण्याची सुविधा युजर्सला मिळाली होती. यात आता कुणीही ध्वनी संदेश पाठवून ट्विट करू शकतो. यासाठी ट्विट कंपोज करण्याच्या विभागात ऑडिओचा आयकॉन देण्यात आला आहे. यावर क्लिक केल्यानंतर कुणीही व्हाईस रेकॉर्डींग करू शकतो. या फिचरच्या अंतर्गत एकदा १४० सेकंदाइतकी व्हाईस रेकॉर्डींग करता येते. तर यापेक्षा जास्त वेळ बोलायचे असल्याचे विविध ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात रेकॉर्डींग शक्य असून या सर्व क्लिप एकाच ट्विटमध्ये थ्रेडच्या स्वरूपात शेअर करता येतात.

ट्विटरने व्हाईस ट्विट करण्याची ही सुविधा पहिल्यांदा आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी आणि ती देखील मर्यादीत स्वरूपात दिलेली आहे. तथापि, लवकरच आयओएसचे सर्व युजर्स आणि अँड्रॉइड व डेस्कटॉप युजर्सला ही सुविधा प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ट्विटरतर्फे देण्यात आली आहे. तर, यासोबत ट्विटरने लिस्ट सर्च करण्याची सुविधा देखील आपल्या युजर्सला दिली असून या माध्यमातून कुणालाही त्याला हव्या असणार्‍या टॉपीकला फॉलो करणे सोपे जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here