व्हाटसअ‍ॅपच्या पिक्चर-इन-पिक्चर फिचरमध्ये मिळणार ‘ही’ सुविधा

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आधीच कार्यान्वित केलेल्या पिक्चर-इन-पिक्चर या फिचरमध्ये नवीन सुविधा मिळणार असून पहिल्यांदा याला बीटा युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅप आपल्या बीटा आवृत्तीमध्ये अनेक नवीन फिचर्स हे सर्व युजर्सला सादर करण्याआधी प्रयोगात्मक स्थितीमध्ये देत असते. या अनुषंगाने २.१९.२७७ या ताज्या आवृत्तीतही काही नवीन फिचर्स दिलेले आहेत. यातील लक्षणीय बाब म्हणजे आधीच दिलेल्या पिक्चर-इन-पिक्चर या फिचरमध्ये आता थोड्या प्रमाणात सुधारणा करण्यात आलेली आहे. सध्या कोणताही ग्रुप वा वैयक्तीक चॅटमध्ये हे फिचर वापरता येते. आगामी काळात मात्र याचा विस्तार होणार असून ग्रुप वा वैयक्तीक चॅटच नव्हे तर व्हाटसअ‍ॅप बंद केले तरी या अ‍ॅपवरून सुरू केलेला व्हिडीओ हा वेगळ्या विंडोमध्ये सुरू राहणार आहे. वर नमूद केल्यानुसार पहिल्या टप्यात याला प्रयोगात्मक अवस्थेत प्रदान करण्यात आले असून लवकरच अँड्रॉइड प्रणालीच्या सर्व युजर्ससाठी हे फिचर प्रदान करण्यात येईल असे मानले जात आहे. अर्थात, व्हाटसअ‍ॅपवर प्ले केलेला कोणताही व्हिडीओ हे अ‍ॅप बंद केले तरी सुरू राहणार असल्याची बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here