‘व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस’वर प्रॉडक्ट कॅटलॉगची सुविधा

0

‘व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस’ या अ‍ॅपवर आता कुणालाही आपल्या प्रॉडक्टचा कॅटलॉग तयार करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

व्हाटसअ‍ॅपने खास व्यावसायिकांसाठी ‘व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस’ हे स्वतंत्र अ‍ॅप सादर केले असून यात नियमित फिचर्ससह अतिरिक्त सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. जगभरात हे अ‍ॅपदेखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत. व्हाटसअ‍ॅपच्या मुख्य अ‍ॅपप्रमाणे यातदेखील वेळोवेळी नवनवीन उपयुक्त फिचर्सचा अंतर्भाव करण्यात येत आहे. या अनुषंगाने यात आता ‘प्रॉडक्ट कॅटलॉग’ची सुविधा देण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार या फिचरचा उपयोग करून कुणीही आपापल्या उत्पादनांची माहिती आपल्या ग्राहकाला देऊ शकतो. यात संबंधीत प्रॉडक्टचे नाव, याचे विवरण, फोटो आणि मूल्यासह माहिती देता येणार आहे. यासाठी युजरला सेटींगमार्गे बिझनेस सेटींगमध्ये जाऊन प्रॉडक्टची प्रतिमा, मूल्य आदी माहिती टाकावी लागेल. यात संबंधीत प्रॉडक्टबाबत अधिक माहिती देणारी लिंक वा सवलत प्रदान करणारा प्रोमो कोडदेखील टाकता येणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सुलभ असल्यामुळे कुणीही याला अगदी सहजपणे वापरू शकतो. या फिचरच्या माध्यमातून कुणीही व्यावसायिक आपल्या ग्राहकासोबत अधिक उत्तम प्रकारे कनेक्ट होऊ शकतो. अर्थात, यामुळे त्याला व्यावसायिक लाभ होणार हेदेखील निश्‍चित.

‘व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस’ अ‍ॅपच्या प्रॉडक्ट कॅटलॉग या फिचरला भारतासह ब्राझील, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इंडोनेशिया आदी देशांमध्ये सादर करण्यात आले आहे. तर अन्य देशांमध्ये याला लवकरच उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती व्हाटसअ‍ॅपतर्फे देण्यात आलेली आहे.

पहा : ‘व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस’वर प्रॉडक्ट कॅटलॉग तयार करण्याची प्रक्रिया दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here