व्हाटसअ‍ॅप वेबवरही पिक्चर-इन-पिक्चर मोड

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅप वेबवरून वापरणार्‍या युजर्सलाही आता पिक्चर-इन-पिक्चर मोड या पध्दतीत व्हिडीओ पाहता येणार आहे.

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर अलीकडेच पिक्चर-इन-पिक्चर मोड सादर करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून आता कुणीही युट्युबसह अन्य संकेतस्थळांवरील व्हिडीओ पाहतांना त्या अ‍ॅपवर रिडायरेक्ट होण्याऐवजी व्हाटसअ‍ॅपच्या इंटरफेसवरच व्हिडीओ पाहू शकतो. यामुळे व्हिडीओ तात्काळ लोड होत असल्यामुळे युजरला हे फिचर चांगलेच भावल्याचे दिसून येत आहे. याआधी हे फिचर फक्त व्हाटसअ‍ॅपच्या अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपसाठी उपलब्ध होते. मात्र लवकर ही सुविधा वेबवरून व्हाटसअ‍ॅपचा उपयोग करणार्‍यांनाही मिळणार असल्याचे वृत्त आहे.

व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अगदी अचूकपणे भाकीत करणार्‍या WaBetaInfo या संकेतस्थळाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार, व्हाटसअ‍ॅप फॉर वेबची ०.३.२४१ ही नवीन आवृत्ती सादर केली आहे. यामध्ये पिक्चर-इन-पिक्चर मोड येणार असल्याचे निदर्शनास आले आहे. अर्थात ही नवीन आवृत्ती वापरणारे युजर्स आता याच प्रकारात (पिक्चर-इन-पिक्चर) व्हिडीओ पाहू शकतात. याशिवाय, या ताज्या आवृत्तीमध्ये अनेक बग्ज हटविण्यात आले असल्याची माहिती WaBetaInfo या संकेतस्थळाने दिली आहे. दरम्यान, व्हाटसअ‍ॅपवर लवकरच डार्क मोड येणार असून याची चाचणी आता अंतिम टप्प्यात आल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here