व्हाटसअ‍ॅपवर क्रिकेट स्टीकर्सचा खजिना

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आपल्या भारतीय युजर्ससाठी क्रिकेट स्टीकर्स उपलब्ध केले असून लवकरच अ‍ॅनिमेशन स्टीकर्सही येणार आहेत.

व्हाटसअ‍ॅप आपल्या युजर्सला नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटा लावला आहे. या अनुषंगाने आता युजर्ससाठी क्रिकेटचे स्टीकर्स देण्यात येत आहेत. सध्या आयपीएलचा सिझन ऐन शिखरावर असून लवकरच क्रिकेटचा विश्‍वचषकदेखील होणार आहे. याच्या पार्श्‍वभूमिवर, क्रिकेटचे स्टीकर्स देण्यात आल्याचे मानले जात आहे. स्टीकर्सच्या माध्यमातून युजर्स आपल्या भावना अधिक चांगल्या व आकर्षक पध्दतीत व्यक्त करू शकत असून यामुळे युजर्सची एंगेजमेंट मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आधीच दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, व्हाटसअ‍ॅपचे क्रिकेट स्टीकर्स हे लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात हे स्टीकर्स अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठी देण्यात आले असून लवकरच ते आयओएससाठीही सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, व्हाटसअ‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स सादर करणार असल्याची माहितीदेखील काही दिवसांपूर्वीच समोर आलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे फिचर जगभरातील सर्व युजर्सला वापरता येणार आहे. अ‍ॅनिमेटेड स्टीकर्सदेखील नियमित स्टीकर्सच्या विभागात सर्च करून वापरता येणार आहेत. तर व्हाटसअ‍ॅपवर लवकरच नवीन प्रकारच्या इमोजीदेखील देण्यात येणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here