संशयास्पद नावे असणार्‍या व्हाटसअ‍ॅप ग्रुप होत आहेत ब्लॉक

0

व्हाटसअ‍ॅपने आता संशयास्पद नावे असणार्‍या व्हाटसअ‍ॅप ग्रुप्सला ब्लॉक करण्यास प्रारंभ केला असून या माध्यमातून फेक न्यूजला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हाटसअ‍ॅप हे वापरण्यासाठी सुरक्षित नसल्याचे अलीकडच्या काही घटनांनी स्पष्ट झाल्याने या मॅसेंजरच्या लोकप्रियतेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. लोक या मॅसेंजरला पर्याय शोधू लागले आहेत. या अनुषंगाने डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न व्हाटसअ‍ॅपकडून होऊ लागले आहेत. यातील एक प्रकार नुकताच युजर्सला दिसून आला आहे. यात एखाद्या व्हाटसअ‍ॅप ग्रुपचे नाव हे धार्मीक, वांशिक कट्टरतावाद अथवा हिंसा व लैंगीकतेशी संबंधीत असल्यास तो ग्रुप ब्लॉक केला जात आहे. व्हाटसअ‍ॅपच्या सर्व आगामी फिचर्सबाबत अचूकपणे भाकित करणार्‍या WaBetaInfo या संकेतस्थळानेही या प्रकाराबाबत भाष्य केले आहे.

एका युजरने तो असलेल्या एका व्हाटसअ‍ॅप ग्रुपचे नाव बदलून चाईल्ड पोर्नोग्राफी ठेवले असता हा ग्रुप तातडीने ब्लॉक करण्यात आला. यासोबत संबंधीत युजरचे अकाऊंटदेखील ब्लॉक करण्यात आले. याबाबत त्या युजरने व्हाटसअ‍ॅपकडे संपर्क साधला असता, नियमाचा भंग केल्याने अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याच प्रकारे अन्य युजर्सने ग्रुपचे नाव असभ्य भाषेत ठेवताच वा आधीच्या ग्रुपचे नाव बदलताच हा प्रकार घडल्याचे दिसून आले. याबाबत सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

व्हाटसअ‍ॅपने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, मॅसेंजरवरून हेट स्पीच, फेक न्यूज आदींचा प्रचार व प्रचार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, व्हाटसअ‍ॅपने अलीकडेच ग्रुपची माहिती संपादीत करण्याचे सर्वाधिकार ग्रुप अ‍ॅडमीनला प्रदान करण्याची सुविधादेखील दिली आहे. याचा वापर केल्यास कुणी ग्रुपच्या नावाशी छेडछाड करू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here