व्हाटसअ‍ॅपवर ‘कंटिन्युअस ऑडिओ मॅसेज’ फिचर

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी ‘कंटिन्युअस ऑडिओ मॅसेज’ हे नवीन फिचर दिले असून आधी याला आयओएस युजर्ससाठी सादर करण्यात आले होते.

व्हाटसअ‍ॅप आपल्या युजर्सला नवनवीन फिचर्स प्रदान करत आहेत. मार्च महिन्यात कंटिन्युअस मॅसेज फिचर्सची माहिती पहिल्यांदा समोर आली होती. यानंतर हे फिचर आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आले होते. आता हेच फिचर अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीमसाठी देण्यात आले असून याबाबत WaBetaInfo या संकेतस्थळाने सविस्तर माहिती दिली आहे.

व्हाटसअ‍ॅपवर ऑडिओ स्वरूपातील संदेश पाठविला असता तो समोरच्या युजरला क्लिपच्या स्वरूपात जातो. या क्लिपवर क्लिक केल्यानंतर त्या संदेशातील ध्वनी ऐकता येतो. आता या प्रकारातील एकापेक्षा जास्त संदेश पाठविले तर तितक्या वेळेस क्लिक करणे क्रमप्राप्त होते. मात्र आता ही कटकट वाचणार असून याचसाठी कंटिन्युअस ऑडिओ मॅसेज हे फिचर देण्यात आले आहे. यात एकापेक्षा जास्त ऑडिओ स्वरूपातील संदेश पाठविल्यानंतर फक्त पहिल्या क्लिपवर क्लिक करावे लागेल. यानंतर मात्र क्लिक करण्याची आवश्यकता उरणार नाही. म्हणजेच, एकामागून एक या प्रकारात त्या ऑडिओ क्लीप्स ऑटो-प्ले होतील. यामुळे संबंधीत युजरचा त्रास वाचणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये अँड्रॉइड प्रणालीच्या सर्व युजर्सला ही सुविधा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here