व्हाटसअ‍ॅपवर येणार बुमरँग फिचर : जाणून घ्या सर्व माहिती

0

व्हाटसअ‍ॅपवर लवकरच बुमरँग हे फिचर देण्यात येणार असून याच्या माध्यमातून युजर लूप व्हिडीओ तयार करून शेअर करू शकेल.

इन्स्टाग्रामवर बुमरँग हे फिचर आधीच प्रदान करण्यात आले असून याला युजर्सची चांगली पसंती मिळालेली आहे. आता हेच फिचर व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे. व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अतिशय अचूकपणे पूर्व सूचना देणार्‍या WaBetainfo या संकेतस्थळाने याबाबत सविस्तर माहितीयुक्त वृत्त दिले आहे. यानुसार व्हाटसअ‍ॅपच्या युजर्ससाठी लवकरच बुमरँग फिचर दिले जाणार आहे. याच्या अंतर्गत युजर लूप व्हिडीओ तयार करून शेअर करू शकणार आहे.

लूप व्हिडीओ हा सहा-सात सेकंदाच्या लांबीइतका व्हिडीओ असून तो कंटिन्यू प्ले होत असतो. हा प्रकार जीआयएफ अ‍ॅनिमेशनपेक्षा वेगळा असल्याची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. व्हाटसअ‍ॅपवर आधीच जीआयएफ अ‍ॅनिमेशनचा वापर करण्याची सुविधा दिलेली असली तरी लूप व्हिडीओ तयार करून याला शेअर करण्याची सुविधा बुमरँग या फिचरमधून मिळणार आहे. हाच लूप व्हिडीओ दुसर्‍या युजर्सला शेअर करण्यासह व्हाटसअ‍ॅपवर स्टेटस अपडेट म्हणूनही वापरता येणार आहे. हे फिचर पहिल्यांदा आयओएस तर नंतर अँड्रॉइड युजर्ससाठी येईल असे या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये व्हाटसअ‍ॅपचे बुमरँग हे फिचर नेमके कसे कार्य करेल याची माहिती दर्शविण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here