व्हाटसअ‍ॅपवर आता आपोआप नष्ट होणारा संदेश पाठविण्याची सुविधा

0

व्हाटसअ‍ॅपने आता युजर्ससाठी आपोआप नष्ट होणारा संदेश पाठविण्याची सुविधा दिली असून पहिल्यांदा हे फिचर प्रयोगत्मक अवस्थेत देण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपवर स्नॅपचॅटप्रमाणे फिचर येणार असल्याची माहिती गेल्या महिन्यातच समोर आली होती. आता हेच फिचर प्रयोगात्मक म्हणजेच बीटा अवस्थेत देण्यात आले आहे. व्हाटसअ‍ॅपने आपल्या बीटा युजर्ससाठी २.१९.२८२ ही आवृत्ती सादर केली असून यात हे फिचर डिलीट मॅसेज या नावाने उपलब्ध करण्यात आले आहे. खरं तर, आधीच स्टेटसच्या माध्यमातून व्हाटसअ‍ॅप युजर्सला नष्ट होणारे अपडेट करता येते. स्टेटस हे २४ तासानंतर आपोआप नष्ट होते. तथापि, यालाच आता कोणताही ग्रुप अथवा वैयक्तीक चॅटींग करतांना पोस्टच्या स्वरूपात टाकण्याची सुविधा मिळणार आहे. यात २४ तास नव्हे तर युजरला ५ सेकंद ते १ तास या वेळेतील हवा तितका टाईम सेट करता येणार आहे. यामुळे युजर कोणतीही पोस्ट शेअर करण्याआधी एक पॉप-अप विंडो समोर येईल. यात संबंधीत मॅसेज हा सेल्फ डिस्ट्रक्ट या प्रकारात पाठवायचा आहे का ? अशी विचारणा केली जाईल. यात ५ सेकंद आणि १ तास अशा दोन पर्यायांमधून हवा तो पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर संबंधीत मॅसेज हा विहीत वेळेनंतर आपोआप नष्ट होणार आहे. डीलीट फॉर एव्हरीवन या फिचरच्या अंतर्गत मॅसेज डिलीट केला तरी याची माहिती समोरच्याला होत असते. तथापि, या नव्या फिचरच्या माध्यमातून नष्ट करण्यात आलेल्या मॅसेजचे कोणतेही चिन्ह राहणार नाही. अर्थात, संबंधीत मॅसेज हा खरोखर परिपूर्ण पध्दतीत नष्ट होणार आहे.

व्हाटसअ‍ॅपचे हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत असून सर्व युजर्ससाठी ते लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here