व्हाटसअ‍ॅपवर येणार क्विक मीडिया एडिटची सुविधा

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपवर लवकरच आपण पाठवत असणार्‍या मीडिया फाईल्सला एडिट करण्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत तंतोतंत माहिती देण्यासाठी ख्यात असणार्‍या WABetaInfo या संकेतस्थळाने अजून एका नवीन फिचरचे सूतोवाच केले आहे. यानुसार व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला लवकरच क्विक मीडिया एडीट या नावाने नवीन फिचर प्रदान करण्यात येणार आहे. आधीच युजर्सला मीडिया एडिट करण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या अंतर्गत आपण प्रतिमा वा व्हिडीओ फॉरवर्ड करतांना त्याखाली त्याचे विवरण/कॅप्शन देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. आता हीच प्रक्रिया अधिक सुलभ पध्दतीत पार पाडण्यासाठी क्विक एडिट हे फिचर उपयुक्त ठरणार आहे.

या नवीन फिचरच्या अंतर्गत युजरला एखादी प्रतिमा ही दुसरा युजर अथवा कोणत्याही ग्रुपमध्ये फॉरवर्ड करायची झाल्यास एडिट या नावाने नवीन पर्याय देण्यात येणार आहे. यानंतर ही प्रतिमा पुढे पाठविण्याआधी यावर रेखाटन (डुडल) करता येणार आहे. याशिवाय, याला कॅप्शन देऊन ही प्रतिमा फॉरवर्ड करता येईल. अर्थात, या नवीन फिचरच्या माध्यमातून फॉरवर्ड करण्याआधी यावर रेखाटन करता येणार आहे. हे फिचर पहिल्यांदा प्रयोगात्मक (बीटा) अवस्थेत देण्यात येणार असून नंतर याला सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती WABetaInfoच्या वृत्तात देण्यात आली आहे. हे फिचर अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात येणार आहे.

या फिचरची कार्यप्रणाली खालील अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून आपण समजावून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here