व्हाटसअ‍ॅपवर येणार आपोआप नष्ट होणारे संदेश

0

व्हाटसअ‍ॅपवर लवकरच आपोआप नष्ट होणारे मॅसेज पाठविता येणार असून याचा वापर ग्रुपसोबत पर्सनल चॅटमध्येही करता येणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हाटसअ‍ॅपवर आपोआप नष्ट होणारे संदेश पाठविण्याची सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अद्याप हे फिचर सर्व युजर्सला प्रदान करण्यात आलेले नाही. तथापि, याची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आधी याला फक्त ग्रुप्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. तर ताज्या अपडेटमध्ये हे फिचर ग्रुप्ससह वैयक्तीच चॅटींगमध्येही वापरण्यात येणार असल्याचे अधोरेखीत करण्यात आले आहे. या संदर्भात व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अतिशय अचूकपणे भाकिते करणार्‍या WaBetaInfo व्हाटसअ‍ॅप बीटा इन्फो या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार व्हाटसअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइडच्या बीटा अर्थात प्रयोगात्मक आवृत्तीच्या युजर्ससाठी २:२०:८४ ही आवृत्ती सादर केली आहे. यामध्ये हे फिचर अद्याप कार्यान्वित करण्यात आलेले नाही. तथापि, सोर्स कोडच्या माध्यमातून हे फिचर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. अर्थात, हे फिचर पहिल्यांदा बीटा अवस्थेत देण्यात येणार असून नंतर ते सर्व युजरला वापरता येणार आहे. याच्या अंतर्गत कोणताही ग्रुप अथवा वैयक्तीक इनबॉक्समध्ये पाठविण्यात येणार्‍या संदेशाला तो नेमका किती वेळानंतर नष्ट व्हावा याची सेटींग करण्याची सुविधा मिळणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने आधी स्टेटसच्या माध्यमातून २४ तासांनी आपोआप नष्ट होणारा मॅसेज, इमेज, व्हिडीओ आदी अपडेट करण्याची सुविधा दिलेली आहे. आता याचीच पुढील अद्ययावत आवृत्ती आपोआप नष्ट होणार्‍या मॅसेजच्या माध्यमातून वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here