व्हाटसअ‍ॅपवर बल्क मॅसेज पाठविल्यास पोलीस कारवाई

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्स पॉलिसीमध्ये बदल करून बल्क मॅसेज पाठविणार्‍या युजर्सविरूध्द पोलीस कारवाई करण्याचे जाहीर केले आहेे.

व्हाटसअ‍ॅपने अलीकडच्या काळात फेक कंटेंटला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. यासाठी फॉरवर्डला मर्यादा घालण्यासह संशयास्पद लिंकबाबत अलर्टची तरतूददेखील करण्यात आली आहे. यात आता अजून एका नवीन प्रयत्नाची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हाटसअ‍ॅपने आधीच आपला मॅसेंजर हा आदर्श पध्दतीत वापरण्यासाठीचे नियम जाहीर केले आहेत. यात अजून एका नवीन नियमाची भर पडणार असून याबाबत कंपनीने आपल्या एफएक्यू ( फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्‍चन्स ) या विभागात माहिती दिली आहे. याच्या अंतर्गत आता कुणीही व्हाटसअ‍ॅपवरून बल्क मॅसेजेस पाठविल्यास त्याच्यावर थेट पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. ७ डिसेंबरपासून अशा प्रकारच्या कार्यवाही सुरू होणार असल्याचे व्हाटसअ‍ॅपने नमूद केले आहे. यात नेमकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल याची माहिती दिलेली नसली तरी व्हाटसअ‍ॅप याबाबत आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

व्हाटसअ‍ॅपने व्यावसायिकांसाठी व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस हे स्वतंत्र अ‍ॅप सादर केले असून यात बल्क मॅसेजसह अन्य सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. तथापि, अनेक युजर्स व्हाटसअ‍ॅपच्या मुख्य अ‍ॅपवरून बल्क आणि स्पॅम मॅसेजेस मोठ्या प्रमाणात पाठवितात. यात फेक न्यूज, स्पॅम मॅसेजेस, व्हायरसयुक्त लिंक्स आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. याला आळा घालण्यासाठी फेसबुकने आता ताठर भूमिका घेतल्याचे यातून दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here